शिक्षक संघाच्या सत्तारूढ पॅनेलला शिक्षक सेना संघटनेचा जाहीर पाठिंबा : जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक बँकेच्या निवडणुकीत शिक्षक संघाच्या सत्तारुढ पॅनेलच्या प्रचारार्थ गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे, तालुकाध्यक्ष ए. डी. पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शिक्षक संघाच्या सत्तारुढ पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला.

    यावेळी कृष्णात धनवडे म्हणाले,  राजाराम वरुटे यांच्या मार्गदर्शनाखालील शिक्षक संघाच्या संचालकानी बँक सक्षमपणे उभी केली आहे. संचालकानी खर्चात काटकसर करून सभासदांना चांगला डिव्हींडड व वर्गणी कायम ठेवीवर चांगले व्याज दिले आहे. भविष्यात त्यांच्याकडेच बँकेची सत्ता राहणे गरजेचे आहे. म्हणून शिक्षक सेनेने शिक्षक संघाच्या पॅनेलला पाठिबा दिला आहे.

   राज्याध्यक्ष राजाराम वरुटे म्हणाले, आमच्या संचालकांच्या चांगल्या कामामुळेच शिक्षकांच्या विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. यामुळे विरोधी पॅनेलच्या प्रमुखांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. आता त्यांचा पराभव आहे हे त्यांना दिसू लागले आहे. ज्यांना या बँकेत संचालक म्हणून निवडून आणले. मानाने चेअरमन केले असे  अण्णासो शिरगावे आणि सुभाष निकम यांनी अन्य संघटनेत प्रवेश केला आहे. त्याचा शिक्षक संघाच्या पॅनेलवर कोणताही परिणाम होणार नाही. गडिंग्लज तालुक्यातील गटाचे नेतेच त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास वरुटे यांनी व्यक्त केला.

  यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे, सुकाणू समितीचे शिवाजी रामा पाटील, तालुका नेते डी. पी. पाटील, तालुकाध्यक्ष भैरवनाथ शिंदे आदींची भाषणे झाली. यावेळी  मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.