एकनाथ शिंदे यांच्या बंडाची माहिती मिळाली होती !

मुंबई : राज्य गुप्तचर विभागाने महाराष्ट्रातील बंडाची माहिती दोन महिन्यांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारला दिली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह आठ ते दहा आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात असल्याची  माहिती अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिली होती. 

राज्यातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, राजकीय घडामोडी आणि हालचाली, गुन्हे तसेच समाजकंटक, दहशतवादी आणि माओवादी कारवायाबद्दल आगाऊ सूचना देणे ही राज्य गुप्तचर विभागावर जबाबदारी आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार राजकीय घडामोडींची माहिती महाविकास आघाडी सरकारला तोंडी दिली होती. मात्र,  याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्याचा फटका आता सरकारला बसला आहे.