मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी एक वाजता मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत, त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव व पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवल्यामुळे ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आज राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने असे ट्विट केले असल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शिवसेनेचे आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं सांगितलं जात असून, महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंनीही आपल्या ट्विटर हँडलवरून पर्यावरण मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
या सर्व राजकीय नाट्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारही कोसळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विटर हँडलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवून युवासेना प्रमुख असं ठेवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी एक वाजता मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. यावेळी सहयोगी पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करून ते राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने असे ट्विट केले असल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, शिंदे समर्थक ३५ आमदारांनी अजूनही एकनाथ शिंदे हेच आमचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते असल्याचं सांगितलं आहे. तसं पत्रच विधिमंडळ सचिव आणि अध्यक्षांना देण्यात येणार आहे.
