कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील जिल्हा आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संगीता महिपती गुरव यांची, तर उपाध्यक्षपदी संदीप मारुती नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष इंदुलकर यांनी सुकाणू समितीची निवड जाहीर केली. त्यामध्ये कुमार कांबळे, राजेंद्र पाटील, मंगल पाटील, शरद देसाई, श्रीकृष्ण बांदिवडेकर, विश्वनाथ परमाने, सुनील पाटील आणि संदीप मिरजकर यांचा समावेश आहे. संस्थेच्या स्वीकृत संचालकपदी संभाजी माने यांची निवड झाली.
धन्वंतरी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीमध्ये धन्वंतरी स्वाभिमानी समविचारी पॅनेल बहुमताने विजयी झाले. संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड निवडणूक निर्णय अधिकारी ओतारी यांच्या उपस्थित पार पडली.
निवडणुकीदरम्यान प्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतलेल्या तालुकास्तरीय टीम व सहभागी संघटना प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना सुभाष इंदुलकर म्हणाले, संघटनेसाठी अपार कष्ट घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांना संघटना न्याय देण्याची भूमिका नक्कीच घेणार आहे.सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शेटे, ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ. विलास देशमुख, गडहिंग्लजच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे, प्रशासन अधिकारी डॉ. बाबासाहेब लांब, कक्ष अधिकारी रामचंद्र घाग डॉ. कदम , डॉ. कोरवी, शरद देसाई, महासचिव बंडोपंत प्रभावळे, सी. पी. शिंदे त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुभाष मारकड, अमोल कोळी, जे. पी. गायकवाड, अनिल पवार, सर्जेराव पांडव, बबलू सनदी, बाळू जाधव, अर्जुन कांबळे, अर्जुन पाटील, शरद बेंडखळे , दाभोळकर, काशीद, विजय सावंत, सर्जेराव पांडव , विकास सोनुले ,भीमराव साळवी ,संदीप कुंभार, सुरज तराळ, सर्जेराव रणदिवे , भोईर, प्रकाश नाईक, औषध निर्माण अधिकारी नामदेव सोनवणे कारदगे श्रीमती जाधव , संकपाळ .संध्या कांधने , प्राची बोटे ,पूजा घाटगे, रेखा कोरवी, श्रीमती कुलकर्णी ,कांचन चौगुले, श्रीमती वाघमारे, संस्थेचे संस्थापक माजी चेअरमन डॉ. शिवाजीराव भोई, माजी चेअरमन अरुण मेथे, डॉ. उपाध्ये, अशोक जाधव, आर. डी. पाटील, प्रदीप अष्टेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एकनाथ जोशी यांनी केले. आभार महेश देशमुख यांनी मानले.