कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबई येथे झालेल्या २५ व्या कैप्टन एस. जे. इजिकल महाराष्ट्र राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या कु. जकिया जहीद शिकलगार हिने ५० मीटर रायफल प्रकारात ६०० पैकी ५१२ गुणांची कमाई करत महाराष्ट्रात सातव्या स्थानावर झेप घेतली. या यशामुळे तिची पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जकिया ही येथील छत्रपती शाहू हायस्कूलची विद्यार्थिनी असून आठव्या इयत्तेत शिकत आहे. अतिशय कमी वयात तिने प्राप्त केलेल्या नेत्रदीपक यशामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ती दूधाळी शूटिंग रेंज मध्ये नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे.तिला डिस्ट्रिक्ट मेन अँड वुमेन रायफल असोसिएशनचे प्रशिक्षक तेजस कुसाळे आणि आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि के डी आरएचे सचिव रमेश कुसाले यांचे मार्गदर्शन लाभले.