उंचगाव : ‘अनु-जयाची सोनपवालं’ हे जयवंत याचं आत्मचरित्र सकारात्मक जीवनाचा मंत्र शिकवितं, असे प्रतिपादन प्रा. डॉ. रूपा शहा यांनी केले.
जयवंत पाटील यांच्या ‘अनु-जयाची सोनपावलं’ या आत्मचरित्राचे उंचगाव येथे प्रकाशन झाले. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी ‘महाराष्ट्र केसरी’ विष्णू जोशीलकर, बाबा महाडिक, पै. गणेश मानुगडे, प्रदीप खोचगे, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी आदी प्रमुख उपस्थित होते.
जयवंत पाटील म्हणाले, आम्ही दोघांनी प्रेमविवाह केल्यानंतर खचून न जाता येतील त्या संकटांवर मात करीत इथंपर्यंतचा टप्पा गाठला आहे. अनितानं वयाच्या धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर सुवर्णपदक पटकावून माझ्यासह कुटुंबाचा सन्मान वाढविला. गेली अडीच दशके आम्ही आनंदाने संसार करीत आहोत. हा जीवनप्रवास मांडण्यासाठीच ‘अनु-जयाची सोनपावलं’चा साकारले.
ॲड. धनंजय पठाडे यांनी जयवंत व अनिता यांनी खडतर प्रवासातून मार्ग काढत जीवन यशस्वी केल्याबद्दल कौतुक केले. यावेळी विष्णू जोशीलकर, बाबा महाडिक, गणेश मानुगडे, कृष्णात चौगुले, वृक्षमित्र सुभाष पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. ‘भाग्यश्री प्रकाशन’च्या भाग्यश्री पाटील, श्रेयश वाईंगडे, संग्राम यादव, शिवाजी पाटील, अवी माने, नीलेश संकपाळ, गणेश चव्हाण, सचिन राठोड, उत्तम मोरे आदी उपस्थित होते. कृष्णात माने यांनी सूत्रसंचालन केले. किरण चौगुले यांनी आभार मानले.