सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर…

मुंबई : सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं, अशी बोचरी टीका भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

आठ दिवसांपूर्वी वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळलं या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी पत्र पाठवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राणे यांनी पत्रात म्हंटले आहे की, सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीनं राज्य चालतं. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो.

गुन्हेगारीचं साम्राज्य, भ्रष्टाचाराची दलदल वाढून सामान्य मुंबईकरांच्या उंबऱ्यापर्यंत पोहचली आहे. तुम्हीही मुंबईचे रहिवाशी असल्याने ढिसाळ कारभाराची राड तुमचा उंबरा एक दिवस ओलांडणारच होती. आता तस झालं आहे. गुरुवारी ९ जूनला तुमच्या निवास्थानाहून हाकेच्या अंतरावर असलेल्या शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशीर बांधकाम कोसळलं आहे. १७ जण जीवन मरणाशी लढा देत आहेत. ४० वर्षीय युवकाचा बळी केला. त्याच्या कटुंबियांनी फोडलेल्या टाहोने मुंबईच्या काळाजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथं भेट देऊन विचारपुस करण्याची तसदीही घेतली नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की त्या निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगले आहेत.