दहावीचा निकाल जाहीर : कोकण पुन्हा अव्वल; कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षीही राज्यातून सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल 99.27% टक्के तर कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून कोल्हापूर विभागाचा निकाल 98.50 टक्के लागला आहे. राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला आहे.

कोकण विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला असून बारावी परीक्षेप्रमाणे दहावीच्या निकालातही कोकण विभाग अव्वल आला असून 99.27% टक्के निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल हा नाशिक विभागाचा लागला आहे.  नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के लागला आहे. एकूण १५,६८,९७७ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १५,२१,००३लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात पुन्हा सावीत्रीच्या लेकींनी बाजी मारली आले. २०२०च्या तुलनेत निकालात तब्बल १.६४ टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

विभागानुसार निकालाची टक्केवारी

कोकण विभाग – 99.27%

कोल्हापूर विभाग – 98.50

पुणे विभाग – 96.96

नागपूर विभाग – 97.00

औरंगाबाद विभाग – 96.33

मुंबई विभाग – 96.94

अमरावती विभाग – 96.81

नाशिक विभाग – 95.90

लातूर विभाग – 97.27