इचलकरंजी (प्रतिनिधी) : उघड्या दरवाजातून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून सोन्या- चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याबाबत लक्ष्मी निवास कांबळे (रा. केटकाळे नगर समोर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली होती. या चोरीचा शिवाजीनगर पोलिसांनी छडा लावून २४ तासांच्या आत आरोपीस अटक केली आहे.

गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना हा गुन्हा एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने केला असल्या बाबतची गोपणीय माहीती प्राप्त झाली. त्याअनुषंगाणे विधीसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेवून ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने वरील गुन्हा केला असलेची कबूली दिली असुन त्याच्या कडून सोन्याचे कुडे, झुबे, फुले, रिंगा, वेल प्रत्येकी एक जोड, लटकन दोन जोड व एक चांदीचा मेखला असा एकुण ६५,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस हवालदार वाजीद मोमीन, पो.ना. सागर चौगले, सुनिल बाईत, गजानन बरगाले, अमित कांबळे, विजय माळवदे, प्रविण कांबळे, सतिश कुंभार, पवन गुरव यांनी चोरीचा छडा लावून २४ तासांच्या आत आरोपीस अटक केली आहे.