विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘यांची’ माघार; सहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत व राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे यांनी आपला अर्ज माघार घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ उरलेला असताना त्यांनी अर्ज मागे घेतला. आता भाजपचे पाच तर महाविकास आघाडीचे सहा उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दहा जागांसाठी बारा उमेदवारांनी अर्ज भरले होते. राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधान परिषदेसाठी भाजपची तयारी करण्यात आल्याचे सुरूवातीपासून सांगितले जात होते. सहाही उमेदवार जिंकतील असा दावा नेत्यांकडून केला जात होता. पण सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला आहे.

विधान परिषदेबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काही वेळापूर्वीच भाजपची बैठक झाली. या बैठकीत खोत यांनी माघार घेण्याबाबतचा निर्णय झाला. तसेच सदाभाऊ खोत यांनी आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. १५ मिनिटे दोघांची चर्चा झाली. त्यानंतर खोत यांनी अर्ज मागे घेतला. एका जागेसाठी २७ मतांचा कोटा आहे. भाजपचे संख्याबळ पाहता चार उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. पण त्यानंतरही भाजपने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

भाजप उमेदवार
1) प्रवीण दरेकर
2) राम शिंदे
3) श्रीकांत भारतीय
4) उमा खापरे
5) प्रसाद लाड

शिवसेना
1) सचिन अहिर
2) आमशा पाडवी

काॅंग्रेस
1) चंद्रकांत हंडोरे
2) भाई जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस
1) रामराजे नाईक निंबाळकर
2) एकनाथ खडसे

🤙 9921334545