सिंधुदुर्ग : आतापर्यंतच्या इतिहासात एकाही मुख्यमंत्र्यानी जी भाषा वापरली नाही अशा भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आम्ही वाघ आहोत, आम्ही अमुक आहोत.. असे ते म्हणाले. जी भाषा वापरायला नको ती भाषा त्यांनी वापरली. त्यामुळे उद्धव ठाकरेंची नाचक्की झाली, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते. राणे म्हणाले, शिवसेना सांगत होती की आम्ही तीन जागा जिंकणार पण काय झाले? संजय राऊतही काठावर पास झाले. आमच्या हातून संजय राऊत थोडक्यात वाचले.
राऊतांना महाविकास आघाडीचे मते मिळायला हवी होती. तितकीही मते त्यांना मिळाली नाहीत. त्यामुळे तुम्ही अल्पमतात आहात. मुख्यमंत्र्यांना नैतिकतेचे भान असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.