मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राऊतांना टोमणा मारला “अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे. हे सगळं कमवावं लागते.”

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागल्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी गद्दारी केलेल्या आमदारांची नावे जाहीर केली आहेत. “आमदारांबद्दल आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, त्यांचा अपमान करण्याचा आमचा मानस नाही. कारण आमच्या हातात दोन दिवस ईडी दिलं तर फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील.” अशी टीका राऊतांनी केली होती. आता यावरच भाजप नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. “संजय राऊत दोन दिवसासाठी ईडी मागताय जस हजार उदार मागताय. अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं.”, असा टोला निलेश राणे यांनी ट्वीट करत लगावला आहे.
