छ. शाहु स्मृती शताब्दी वर्षानिमित्त दिव्यांग व्यक्ती सशक्तीकरणासाठी विविध योजना राबवणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त जिल्ह्यातील ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय आज जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

कल्याणकारी योजना, आवश्यक योजनांची निवड, अमंलबजावणी करताना येणाऱ्या अडी अडचणीवर चर्चा करणे व परिणामकारक योजना राबवणेसाठी दिव्यांग क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या अभ्यासु व्यक्तींच्या चर्चासत्र आयोजन करण्याबाबत आज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली.

यावेळी कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, दिव्यांगांसाठी जिल्हा परिषदेचा दोन कोटीचा निधी असून त्यातून दिव्यांगांसाठी कोणकोणत्या योजनांचा लाभ देता येईल याबाबत चर्चा केली. काही शासकीय नियमांमध्ये बदल करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल.

दिव्यांगांचा सव्हें ग्रामीण पातळीवर आशा वर्कस च अंगणवाडी सेविकांच्यामार्फत करून त्यावर उपाय योजना करण्यात येईल. कर्णबधिरत्व घालवण्यासाठी जन्मजात बाळाचे वाचा उपचारतज्ञ मार्फत त्यांचे स्क्रीनींग व टेक्नॉलॉजीचा वापर करून लहान मुलांचे कॉन्प्लेअर इन्प्लॉट ऑपरेशन गरजेनुसार सेवा शासकीय रूग्णालयात मोफत करण्यात येईल.
तसेच दिव्यांग मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण तालुकास्तरावर देण्याबाबत चर्चा इ पाली. कर्णबधिरांची मातृभाषा साइन लँग्वेज ही कर्णबधिरांच्या शिक्षणपध्दतीमध्ये विदभाषीक करण्यास सर्व कर्णबधिर शाळेत करण्यात यावेत असे डॉ. दिलीप देशमुख यांनी सांगितले.

यावेळी डॉ. काश्मिरी बडबडे, (सन्मती मतिमंद मुलांची शाळा, इचलकरंजी), पवन खेबुडकर (चेतना विकास मंदिर, कोल्हापूर), नरेश बगरे (चेतना व्यवसाय उत्पादन व प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर), श्रीमती नसीमा हुरजूक, (साहस डिसॅबिलिटी रिसर्च ॲन्ड केयर फौडेशन, कोल्हापूर), डॉ. दिलीप देशमुख, (रोटरी डेफ स्कुल तिळवणी), सुरेश कुन्हाडे, माजी आमदार राजीव आवळे, (हॅन्डीकॅप व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर), अतुल जोशी, (कागल तालुका मंडळ), आम्रपाली क्षीरसागर फिडींग इंडिया), ज्योती सावंत, (नॅशनल फेडरेशन फॉर दी ब्लाईड शाखा कोल्हापूर), सुहास बोंद्रे, (अंधशाळा, कोल्हापूर), श्रीमती शिल्पा हुजूरबाजार, (संवाद स्पीच हिअरींग क्लीनिक), श्रीमती रेखा देसाई, (हेल्पर्स ऑफ दी हॅन्डीकॅप, कोल्हापूर), ॲड. सुप्रिया दळवी आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा समाजकल्याण अधिकारी, दीपक घाटे यांनी केले. आभार अतुल जोशी यांनी मानले.