दुबई : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर आज त्यांच्या निधनाची बातमी आली आहे.

बऱ्याच काळापासून पाकचे माजी लष्करशहा परवेज यांची प्रकृती खालावली होती. पाकिस्तानच्या मीडियानुसार, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. शेवटी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. 78 वर्षीय मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. मुशर्रफ मार्च 2016 पासून दुबईत राहत आहेत.