मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी एका एका आमदाराचे मत फार महत्त्वाचे आहे. पण असे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मतदान करु शकणार नाहीत.
राज्यसभेसाठी महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आमदारांच्या मतांची जुळवा जुळव करण्यात येत आहे. पक्षाकडून प्रत्येक आमदाराला आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश देण्यात आले आहे. शिवसेनेकडून दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून प्रत्येकी १ उमेदवार देण्यात आला आहे. भाजपकडून ३ उमेदवार देण्यात आले आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. मतांची गरज असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मतदान करु शकत नाहीत. मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी केवळ विधानसभा आमदारांनाच मतदान करण्याची मुभा आहे. विधान परिषद आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो. मुख्यमंत्री विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले आहेत.