भाजपच्या औरंगाबाद कार्यालयावर भाजपच्याच ‘यांच्या’ समर्थकांची दगडफेक

औरंगाबाद : विधान परिषदेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत औरंगाबादमधील भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली. यात कार्यालयाचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी कारवाई करत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आंदोलन करताना भाजपाविरोधात घोषणाबाजी देखील केली आहे. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपकडून सतत अन्याय केला जात आहे, अशी भावना यावेळी त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. यावेळी पंकजा नाही तर भाजपही नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. इतकंच नाही तर, कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाही दिल्या. “भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली नाही, तर पुढील निवडणुकांमध्ये ओबीसी समाज भाजपला मत देणार नाही”, असे मतं काही समर्थकांनी व्यक्त केलं आहे. जळगावमध्ये देखील पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं आहे. परभणी शहरात पंकजा मुंडे यांना पाठिंबा देण्यासाठी पोस्टर झळकावण्यात आले आहेत.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण विधान परिषदेसाठी निवडलेल्या पाच उमेदवारांमध्ये पंकजा मुंडे यांना भाजपकडून स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे राज्यातील मुंडे समर्थक नाराज झाले आहेत.

🤙 8080365706