मान्सूनची हुलकावणी

नवी दिल्ली : गेल्या आठ दिवसांपासून मान्सून कर्नाटकच्या कारवार परिसरातच अडकल्याने देशभरात मान्सूनपूर्व पावसाअभावी उष्णतेची लाट पसरली आहे. येत्या चार-पाच दिवसांपर्यंत मान्सून वेगाने पुढे सरसावण्याचीही शक्यता कमी असल्याने देशाच्या मध्य, उत्तर आणि पश्चिम राज्यांत काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे.

पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, झारखंडमध्ये बुधवारी उष्णतेची लाट होती. समुद्रात कोणत्याही प्रकारचे वादळ किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाही. यामुळे मान्सूनचा वेग मंदावला आहे.

राज्यातील १२ जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भातील उष्णतेची लाट आता ओसरणार असून चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज नागपूर हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. कोल्हापूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, नाशिक, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार आहे.

🤙 9921334545