प्रा. सौ. जाहिदा नियाज खान यांची निवड

कोल्हापूर : प्रोजेक्ट सेंट्रल अंतर्गत मीटिंग व युनिटी थ्री डी कार्यशाळेसाठी कोल्हापूरच्या केआयटीमधून प्रा. सौ. जाहिदा नियाज खान यांच्यासह नऊ प्राध्यापकांची सोफिया बल्गेरिया दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

प्रोजेक्ट सेंट्रल हा Erasmus plus या उपक्रमाचा भाग असून युरोपियन युनियन कडून प्रायोजित आहे. या प्रोजेक्टमध्ये एकूण सहा देशांमधील 9 संस्था सहभागी आहेत. भारतामधून दोन संस्था सहभागी असून त्यापैकी केआयटी एक भागीदार संस्था आहे. हा प्रकल्प 2019 पासून कार्यान्वित असून त्याद्वारे अनेक कार्यशाळा विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी घेण्यात आल्या.

या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना परदेशी इंटरंशिपची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्राध्यापकांसाठी डेन्मार्क आणि चीअंग माय येथील विद्यापीठांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. याच प्रकल्पाचा पुढला भाग म्हणून टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ सोफिया येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहा देशांमधील प्राध्यापक सहभागी होत आहेत. या कार्यशाळेसाठी केआयटीमधून नऊ प्राध्यापक सोफिया बल्गेरिया साठी रवाना झाले. यामध्ये प्रा. महेश चव्हाण, प्रा. अजित पाटील, प्रा. नितीन सांबरे, प्रा. उदय भापकर, प्रा. आदित्य खेबुडकर, प्रा. विलास बुगडे, प्रा. ममता कलश, प्रा. जाहिदा खान, प्रा. राबाडे हे सहभागी होत आहेत.

🤙 8080365706