पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परिक्षेचाचा निकाल उद्या, गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आला. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. बारावी बोर्डाच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरु झाल्या आणि ७ एप्रिल रोजी संपल्या होत्या. तर राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. अखेर या सर्वांची प्रतीक्षा संपली असून उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, बारावी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी (८ जून रोजी) दुपारी १ वाजता जाहीर होणार असला, तरी दहावीचा निकाल नेमका कधी लागणार याबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही.
