‘या’ जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करा; गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : अहमदनगरचे जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करावे,  अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. तसेच आपण स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल आणि होळकरशाहीचा सम्मान कराल ही अपेक्षा असं म्हणत नामांतर न केल्यास बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे ध्यानात ठेवा असा इशाराही दिला आहे. 

पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,  आपणास अभिप्रित असेल की शेकडो हिंदूचे जीव गेलेल्या मुंबई बॅाम्बस्फोटाचा सुत्रधार दाऊदच्या बहिणीसोबतचे आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये मुघलशाही पद्धतीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडीत दर्शनापासून जाण्यास रोखलं. यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो. जेव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या हिंदू संस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे की हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे. तसेच नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल आणि होळकरशाहीचा सम्मान कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे ध्यानात ठेवा.

🤙 8080365706