कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने १ जून जागतिक दुग्धदिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक अजित नरके यांच्या उपस्थित झाले. यावेळी सर्व रॅलीतील सहभागी सायकलपटूचे स्वागत संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले.
यावेळी अरुण डोंगळे म्हणाले, दूध हा एक जीवनावश्यक घटक मानला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दुधाची आवश्यकता असते. दुधाचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दुग्ध दिन साजरा करण्यात येतो. यांचे औचीत्य साधून “सायकल चालवा , आयुष्य वाढवा” व “दूध प्या आरोग्य सुधारा” ह्या सामजिक संदेश देण्याच्या उद्देशाने या सायकल रॅलीचे संघामार्फत आयोजन करण्यात आले.
या सायकल रॅलीची सुरवात सकाळी ७ वाजता संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय ते ताराराणी चौक, शिवाजी विद्यापीठ, शाहू नाका मार्गे पुन्हा ताराबार्इ पार्क कार्यालय असे अंदाजे १७ किलोमीटर लांबीचा सायकल प्रवास सर्व सायकलपटूनी पूर्ण केला. या रॅलीमध्ये कोल्हापूर सायकल क्लब,सनराईज सायकल क्लब,कोल्हापूर बाइसिकल क्लब, ट्रेक अॅन्ड ट्रेल्स ग्रुप असे कोल्हापूरातील अनेक क्लबचे जवळपास २५० सायकलपटूनी सहभाग घेतला. कु.चिन्मय दुधगावकर या १३ वर्षीय सर्वात लहान सायकलपटूंने सहभाग घेतला होता तर ६५ वर्षाचे भीमराव सुतार यांनी हि सहभाग घेतला होता. संघाचे संचालक अजित नरके व कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,संघाचे कर्मचारी अधिकारी तसेच महिला सायकलपटू पण मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, आस्थापना व्यवस्थापक डी. के. पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अमोल गडकरी, अशोक पुणेकर, अमित हवालदार व इतर अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.