कसबा बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त जिल्ह्यासह राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. कसबा बावड्यातील त्यांच्या ‘यशवंत निवास’ येथे व सायंकाळी अजिंक्यतारा कार्यालयात लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह नागरिकांची शुभेच्छा देण्यासाठी रिघ लागली होती.

आमदार पाटील यांच्या निवासस्थानी सकाळी कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, मेघराज काकडे, सौ. पूजा ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील, अर्जुन आणि आर्यमन आदी उपस्थित होते.
आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, विश्वेश निपुण कोरे ,गोकुळ संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले,अंजना ताई रेडेकर, मधुरिमाराजे छत्रपती, माजी जि. प. उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षकनेते दादासाहेब लाड, बाबा पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, डी. वाय पाटील शैक्षणिक संकुलातील स्टाफ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. शुभेच्छा देत त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली होती.
सेवा रुग्नालयात फळवाटप
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्यावतीने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा रुग्णालय कसबा बावडा येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
रक्तदान शिबीर, थॅलासेमिया चाचणी
आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलीटीच्यावतीने अजिंक्यतारा कार्यालय येथे रक्तदान व थॅलासेमिया चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
