कोल्हापूर : आसाममध्ये आलेल्या जलप्रलयाने हाहाकार उडाला होता. सर्वत्र पाणीच पाणी, दलदल, दरडी कोसळलेल्या असे शेकडो अडथळे मदत कार्यामध्ये होते. पण या सर्वांवर मात करत व्हाईट आर्मीच्या टिमने हजारो लोकांच्या पर्यंत मदत पोहचवली आणि आसाम सारख्या या भागातही व्हाईट आर्मीने आपल्या कामाचा ठसा उमटविला. मैलो न मैल पायी प्रवास करत संकटात अडकलेल्या लोकांना या टीमने मोठा दिलासा दिला असल्याची माहिती व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी दिली.
गोबारारी येथे या टिमने अनेक वैद्यकिय कॅम्प घेतले तसेच राफलॉन जिल्हयातील दुर्गम समजल्या जाणा-या घेवून लोकांना राझी, रावेनंग, रामलिंग, गुंजून, तसेच डिमा असावो मधील न्यु हाफलॉग शहरातील शतीग्रस्त झालेले रेल्वे स्टेशन, हाफलॉग, मायबॉग येथील दैनफई व खलीमदीसा येथे वैद्यकिय सुविधा आधी अतिशय दुर्गम परिसरात व्हाईट आर्मी ने हे मदत कार्य केले. जलप्रजलयाने निर्माण झालेल्या अनेक नैसर्गिक अडथळे दूर करत या टिमने दिसरु राजी जिल्हयातील बारो हाफलॉग, काना बस्ती, कुकी बस्ती येथे राहत व औषधे फवारणीचे काम केले, दिसरु राजी व नेपाल बस्ती येथील लोकांपर्यंत मदत पोहचविली. व्हाईट आर्मीच्या या टिमला विवेकानंद शिक्षा केंद्र व सेवा भारती या संस्थानी सहकार्य केले. कोठेही कसल्याही प्रकारची नैसर्गिक अथवा कोणतीही आपत्ती आली तर व्हाईट आर्मी मदतीसाठी धाव घेते. आसाम येथे जलप्रलयाने थैमान घातले आहे. आसाम मधील २४ जिल्हे यामुळे बाधित झाले आहेत. येथे जिवीत आणि वित्त हानी मोठया प्रमाणात होत आहे. अषा संकटांत अडकलेल्या लोकांना मदतीचा हात व्हाईट आर्मीने दिला आहे. याबाबतची माहिती व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी दिली. या टीममध्ये डॉक्टर देवेंद्र पवार, डॉ. प्रितम पाटील, सुधिर गोरे, प्रशांत शेंडे, विनायक भाट, केतन म्हात्रे, सौरभ पाटील, कु. शर्वरी रोकडे, शुभान बागवान, शालमोन आवळे, आनंद कोष्टी यांचा समावेश होता.