मंत्री आव्हाडांचा ताफा, वाहतुकीची कोडीं अन् पोलिसाने लगावली चालकाच्या कानशिलात !

कोल्हापूर : अगोदरच वाहतुकीच्या कोंडीमुळे कोल्हापूरकर त्रस्त असतानाच मंत्र्यांचे दौरे सर्वसामान्यांच्या डोक्याचा ताप बनत आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्याची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने सर्वसामान्य वाहनधारकाच्या कानशिलात लगावली.

मंत्री जितेद्र आव्हाड हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून हे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला पोहोचले. देवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी परतीची वाट धरली. यावेळी भाऊसिंगजी रोडच्या दिशेने जात असताना आव्हाडांच्या वाहनांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या वाहतूक कोंडीत वाहनांचा ताफा अडकल्याने पोलिसांची प्रचंड ताराबंळ उडाली. त्यामुळे पोलिस तत्परतेने वाहने बाजूला करत होते. दरम्यान, त्यावेळी एका वाहनधारकाला एक पोलीस कर्मचारी आवाज वर करून वाहन बाजूला करण्यास सांगत होता. चवेळी त्याने त्या वाहनधारकाला थेट कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.