कोल्हापूर : मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्यज्ञान आहे. पण हिंदुत्वाच्या विरोधात चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का? आणि हो… सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला? असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला.
शिवसंपर्क अभियानासाठी संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. संभाजीराजे आणि आमचा विषय आहे, भाजपने त्यामध्ये चोंबडेपणा करू नये, अशा तिखट शब्दात राऊत यांनी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.