डेक्कन स्पोर्ट्स क्लबची पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन २८ ऑगस्टला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डेक्कन स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने येत्या २८ ऑगस्ट २०२२ रोजी पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे समीर नागटिळक, प्रशांत काटे,उदय पाटील,वैभव बेळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धा ही सकाळी ६ वाजता सुरू होणार आहे. ही मॅरेथॉन २१,११ व ५ किलोमीटर अंतराची आहे. या हाप मॅरेथॉन मधील ५ किलोमीटरची मॅरेथॉन ही १३ वर्षांपासून पुढील वय व ११ किलोमीटरची मॅरेथॉन ही १६ वर्षांपासून पुढील वय आणि २१.१किलोमीटरची मॅरेथॉन ही  १८  वर्षांपासून पुढील सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी आहे.