मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत जीभ घसरली. किती लबाडी करायची, असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नसल्याचं विधान त्यांनी केलं आहे.
किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली. त्यांनी दापोलीतील साई रिसॉर्टच्या वीज कनेक्शनचा अर्ज दाखवला, त्यातील सही आणि फोटोवरून त्यांनी अनिल परबांवर निशाणा साधला. हा फोटो तो मी नव्हेमधल्या पणशीकरांचा आहे, की तो मी नव्हेमधल्या अनिल परबचा आहे, अनिल परब यांनी महावितरणाला अर्ज केला, त्यावर सही अनिल दत्तात्रय परब अशी आहे. हा चेहरा पाहिलाय की नाही?, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री किती लबाडी करायची. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नसल्याचं सांगत किरीट सोमय्यांची जीभ घसरली. आता अनिल परबांचा सातबारा कोरा करणार आहे, साई रिसॉर्टचा टॅक्स अनिल परबांनी भरला, मग रिसॉर्ट कदमांचा कसा?, कदम आणि परबांचे पोपट आता बोलायला लागले. अनिल परबांनी नौटंकी बंद करावी. १ रुपयांचा शेअर ५०० रुपयात जाधवा यांनी विकला. यशवंत जाधव यांच्यानंतर श्रीधर पाटणकर हाजीर हो, असं म्हणत किरीट सोमय्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना इशारा दिला आहे.