कागल तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके !

सिध्दनेर्ली : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एक लाख ५८ हजार १५ पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर यांनी दिली.

    शासकीय अनुदानित व खाजगी अशा सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक वाटप करण्यात येणार आहेत. दोन वर्षात कोरोणामुळे पाठ्यपुस्तके मुलांना देताना अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सध्या बालभारतीच्या कार्यालयातून तालुकास्तरावर पुस्तके पाठविण्याचे काम सुरू आहे. कागल तालुक्यात यावर्षी पट संख्येत वाढ झाल्यामुळे पुस्तकांच्या संख्येमध्येही वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढत आहे. इंग्रजी शाळेकडे असणारा कल कमी झाल्याचे  दिसत आहे. अनेक स्तरावर विविध उपक्रम मुलांच्यासाठी राबवले शिष्यवृत्ती मध्ये सुद्धा कागल तालुका अग्रेसर आहे. यावर्षी पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.