किमान हमीभाव, शेतीस दिवसा विजेसाठी कागलमधील ५७ ग्रामपंचायतीकडून ठराव

कागल : कागल तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतीमालाला किमान हमीभाव व शेतीपंपास किमान दिवसा दहा तास वीज पुरवठा करावा, असे ग्रामसभेचे ठराव तालुक्यांतील ५७ ग्रामपंचायतीकडून एकत्रित करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्याकडे देण्यात आले.                           

      शेतीमालाचा हमीभावाचा कायदा व्हावा, याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने संपुर्ण राज्यभर व देशभरातून ठराव केले जात असून ग्रामपंचायतीचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. यावेळी कागल तालुक्यांतील ५७ हून अधिक ग्रामपंचायतीनी शेतकरी हिताचे हे दोन्ही ठराव केलेले असून उर्वरीत ग्रामपंचायतीही लवकरच हे ठराव देणार असल्याचे तालुकाधक्ष बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.    याकरिता डॅा. बाळासाहेब पाटील, सागर कोंडेकर, अविनाश मगदूम, तानाजी मगदूम, नामदेव भराडे, प्रभू भोजे, शिवाजी पाटील,  पांडूरंग चौगुले,  उत्तम बाबर, शिवाजी कळमकर,  राजू बागल, नितेश कोगनोळे, नामदेव शिपेकर,  बाबू सुतार यांचेसह सर्व पदाधिकारी यांनी विशेष योगदान दिले.

🤙 8080365706