मुंबई : संभाजीराजेंच्याबद्दल काय ठरलयं मला काहीच माहिती नाही. पवारसाहेबांसोबत चर्चा झाली असेल तर त्यांना विचारण्याचा आम्हाला अधिकार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, राज्यसभेच्या सहा जागा आहेत. त्यामध्ये दोन जागा भाजप येतात. एक जागा शिवसेनेची येते. तर राष्ट्रवादीची एक जागा येईल आणि कॉंग्रेसची एक जागा येईल. मतं शिल्लक राहतात त्यामध्ये सर्वाधिक मते शिवसेनेची राहणार आहेत. सहसा स्वतंत्र पक्ष असतात ते रुलिंग पार्टीचे ऐकतात. त्यामुळे बघुया काय होतेय ते. कुणी किती जागा लढवायच्या तो त्यांचा प्रश्न आहे. सूचक ज्यांना जास्त त्यांना जागा मिळतील.
अजितजी… क्यूं फिकर करते हो…
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नावे आलेली आहेत. विचार करत असल्याचे राज्यपाल सांगत आहेत.. कधी कधी एखाद्या कार्यक्रमात भेटले तर करेंगे… करेंगे… अजितजी… क्यूं फिकर करते हो… असे त्यावेळी बोलतात असेही अजित पवार म्हणाले.