राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढेल आणि जिंकेलही : संजय राऊत

नवी दिल्ली : राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करा, आकडे आणि मोड दोन्हीही महाविकास आघाडीकडे आहे. राज्यसभेची निवडणूक लढेल आणि जिंकेलही अशा शब्दात संजय राऊत यांनी ट्विट करून विरोधकांना इशारा दिला आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी माजी खासदार संभाजीराजे मैदानात उतरल्याने चुरस अधिकच वाढली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजेंना पाठिंबा दिला. मात्र, शिवसेनेने एकप्रकारे संभाजीराजेंच्या राज्यसभेवरील उमेदवारीला विरोधच केला आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे तरच त्यांना पाठिंबा देऊ, असे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवार देणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. यात आता भाजपनेही तिसरा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याने आता येत्या काळात काय होणार हे मात्र अजूनही स्पष्ट झाले नाही.