कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) तज्ञ संचालकपदी युवराज दत्ताजीराव पाटील, विजयसिंह कृष्णाजी मोरे यांची तर शासन नियुक्त संचालक म्हणून मुरलीधर रघुनाथ जाधव यांची नेमणूक झाल्याबद्दल चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, ‘ गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे. गोकुळमध्ये दूध उत्पादक हा केंद्रबिंदू मानून कामकाज होत असते. स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर साहेबांनी कामकाजाचा जो पायंडा पाडला आहे. त्याच पद्धतीने कामकाज सुरू आहे. भविष्यात ही तीच परंपरा कायमपणे राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे म्हणाले या तिन्ही संचालकांच्या निवडीचा संघाच्या कामकाजात निश्चितच फायदा होईल. यावेळी संचालक अजित नरके, शशिकांत पाटील, किसन चौगले यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्कारास उत्तर देताना तज्ञ संचालक युवराज पाटील म्हणाले,‘ गेली २५ ते ३० वर्ष राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आजपर्यंत सहकारातील व शेतकरी संघ, भूविकास बँक तसेच जिल्हा परिषद या क्षेत्रात काम केले आहे. या अनुभवाचा फायदा गोकुळच्या कामकाजात निश्चित करू.
तज्ञ संचालक विजयसिंह मोरे म्हणाले, ‘ गेली अनेक वर्ष बिद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. माझे व गोकुळचे ऋणानुबंध जुने आहेत. संचालक म्हणून माझी निवड केल्याबद्दल धन्यवाद देतो.
शासन नियुक्त संचालक मुरलीधर जाधव म्हणाले, ‘संघाची प्रगती करण्यासाठी व दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी व दूध संकलन वीस लाख लिटर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहिन.’
याप्रसंगी संचालक बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील उपस्थित होते.