हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी अकबरुद्दीन ओवेसीचे दात तोडून दाखवावेत : नवनीत राणा

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करून अकबरुद्दीनचे दात तोडून दाखवावेत, असे थेट आव्हान खासदार नवनीत राणा यांनी दिले आहे.

खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीत हनुमान चालीसा पठण केले. त्याअगोदर खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. माझा मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न आहे दात तोडण्याची एवढी ताकद असेल तर औरंगजेबच्या कबरीवर ज्यांनी फूल अर्पण केली आहेत. हिंमत असेल तर त्यांचे दात तोडून दाखवा. संभाजी महाराजांना आणि शिवरायांना मानणारा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवर हार अर्पण करतात. महाराष्ट्रात पहिल्यांदा असे घडलं आहे. सगळ्यात मोठा गुन्हा या लोकांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या टीझरमध्ये ज्या प्रमाणे दात तोडण्याचे दाखवण्यात येत आहे. जर ताकद असेल तर त्यांचे दात तोडून .