देवचंद महाविद्यालयात प्रा. राजकुमार कुंभार, प्रा. नितीन कोले यांचा सत्कार

कागल (प्रतिनिधी) : अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालय येथील कनिष्ठ विभागातील हिंदी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. राजकुमार कुंभार यांनी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत लाईफ लाँग लर्निंग ॲण्ड एक्सटेन्शन विभागामार्फत घेतलेल्या हिंदी अनुवाद प्रमाणपत्र ऑफलाइन पद्धतीने झालेल्या परीक्षेत 80% गुण मिळवून ‘अ+’ श्रेणी प्राप्त केल्याबद्दल आणि वाणिज्य विभाग कनिष्ठचे प्रा. नितीन कोले यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार ‘प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी.पी.शाह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. एम. बागवान, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य एस. जी. कागवाडे, पर्यवेक्षक ए.डी. पवार, पर्यवेक्षिका एस.पी. जाधव मॅडम, कार्यालयीन अधीक्षक दत्तात्रय पाटील, ग्रंथपाल प्रभाकर पोळ, व सर्व विषयाचे विभाग प्रमुख,प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सदानंद झळके यांनी केले.