संभाजीराजेंनी घेतली फडणवीसांची भेट

कोल्हापूर : संभाजीराजे छत्रपती यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर झालेल्या या भेटीमुळे चर्चा सुरू झाल्या आहेत.

या भेटीनंतर बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे खासदारकीची संधी मला मिळाली. खासदारपदाची संधी दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी ही भेट होती. 

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, माझा राज्यसभा खासदारपदाचा कार्यकाळ संपला आहे. ज्यांनी मला संधी दिली ते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मी भेट घेतली आहे. त्यांच्यामुळे मला गडकिल्ल्यांचे काम करता आले म्हणून आभार व्यक्त केले असल्याचे त्यांनी सांगितते. ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे लागणार असून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते सर्वांसाठी होतं. केवळ मराठ्यांशी नव्हतं, शाहू महाराजांनी देखील आरक्षण बहुजनांना दिले. त्यामुळे मी देखील बहुजनांसाठी आणि मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.