गगनबावडा : गगनबावडा श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने न्यूज मराठी 24 चे कार्यकारी संपादक सुरेश पाटील यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबत आमदार विनय कोरे यांच्याहस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गगनबावडा श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जीवनगौरव पुरस्कार व समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलराजे पंत अमात्य बावडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विनय कोरे, गगनबावडा तहसीलदार संगमेश कोडे, न्यूज मराठी 24चे चेअरमन प्रा. मदन अहिरे, गगनबावडा पोलीस अधिकारी रणजीत पाटील, गटविकास अधिकारी माधुरी परीट उपस्थित होते.
यावेळी विनय कोरे म्हणाले, समाजासाठी काम करणारी व्यक्तींचा सन्मान होणे गरजेचे आहे. सन्मानातून प्रेरणा घेऊन लोकं समाजासाठी, समाजकार्यासाठी पुढे येतात. अंगणवाडी सेविकांच्या योगदानाची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेतोय हे दाखवून देण्याचे काम या पुरस्काराच्या माध्यमातून होत आहे.
निलराजे बावडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश टक्के, दत्ता पाटील, नंदकुमार पाटील, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी सुतार, महादेव कांबळे, दिगंबर म्हाळुंगेकर आदी उपस्थित होते.