… मग आता पवार कोणाची अवलाद आहेत : सदाभाऊ खोत

येवला (प्रतिनिधी) : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजाराची सूट देऊ, शेतकऱ्याला मोफत वीज देऊ, सातबारा कोरा करू, नाही झाले तर पवाराची अवलाद सांगणार नाही, असे निवडणुकीपूर्वी अजित पवार म्हणत होते. यापैकी एकाही घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही मग आता पवार कोणाची अवलाद आहेत, असे विचारण्याची वेळ आली आहे, अशो जहरी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला.

नाशिक जिल्ह्यातील येवला येथे शेतकरी संवाद दौऱ्या प्रसंगी बोलताना केले. अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबा डमाळे होते.

खोत म्हणाले, भारनियमन चालू आहे शेतकऱ्यांची मुले रात्री-बेरात्री शेताला पाणी देतात, अनेकदा लाईटच नसते त्यांनी जगावे की मरावे हा प्रश्न असून शरद पवार साहेबांकडे मी हरबल तंबाखूची बियाणी मागितली होती, अद्याप मला त्यांनी दिलेली नाहीत. टीव्ही लावला तर सरकारचा भ्रष्टाचार मंत्र्यांचा भ्रष्टाचार याशिवाय विशेष बातम्या दिसत नाही पैसे खायची सवय लागल्यामुळे एकापेक्षा एक वरचढ मंत्री भ्रष्टाचार करत आहेत. छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा त्यांना नीट चालता येत नव्हते. त्यांच्या छातीत कळा निघायच्या आता पुन्हा मंत्री झाले तर ते तरा तरा चालायले लागले आहेत. कोरोणा काळात जनतेला घरी बसायला सांगणारे ठाकरे सरकार मात्र कोरोणाच्या नावाखाली विविध योजनांचे पैसे खाण्यात मग्न होते. पैसे मोजण्याची मशीन लावले मात्र कोरोणा रुग्ण बरा होण्यासाठी केंद्र सरकारने पैसे दिलेत. देवेंद्र फडणीस विश्वासाने सरकार चालवत होते. आता विश्वासघाताचे सरकार म्हणजे मातोश्री ठाकरे यांचे सरकार होय, एमपीएससीच्या परीक्षा घेतल्या नाहीत. पैसे देईल त्याला उत्तर पत्रिका दिल्या मात्र पैसे नसल्याने गरीब मायबाप च्या मुलांचे काय? पोलीस भरती व मेडिकल भरतीसाठी बोगस सर्टिफिकेट करण्यात आले या सरकारने जनतेला कुठे नेऊन ठेवले असा सवाल शेवटी आमदार खोत यांनी केला.