कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृती शताब्दीनिमित्त महापालिकेच्यावतीने दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयास व नर्सरी बाग येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी उप-आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले व अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृती शताब्दीनिमित्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सकाळी 10 वाजता महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात 100 सेंकद स्तब्ध उभे राहून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अग्निशमनच्या जवानांची महापालिकेच्या चौकात 100 नंबरची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या ऑडिओ सिस्टीमवर, आरोग्य विभागामार्फत ॲटो टिप्परवर व केएमटी बसमध्ये नागरीकांना माहिती होणेसाठीही या कार्यक्रमाची ऑडिओ क्लिप प्रसारीत केली होती. त्याचबरोबर विभागीय कार्यालय क्रं. 1 ते 4, वर्कशॉप, के.एम.टी.च्या शाहू क्लॉथ मार्केट येथील प्रधान कार्यालय, शहर पाणी पुरवठा कार्यालये, मुख्य यंत्रशाळा-शास्त्रीनगर, मध्यवर्ती बसस्थानक, गंगावेश, छ.शिवाजी महाराज चौक, श्री शाहू मैदान, महाराणा प्रताप चौक येथील बस वाहतूक नियंत्रण केंद्रे तसेच गर्दीच्या बस थांब्यांवर, महापालिकेची सर्व हॉस्पीटलमध्ये, शाळा, कॉलेजमध्ये शाळेच्या ग्राऊंडवर १०० सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील 200 बचतगटाच्या 400 महिला राजामपूरी येथील राजाराम गार्डन येथे एकत्र जमून 100 सेंकद स्तब्ध उभे राहून कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर यासर्व बचत गटांच्या महिलांनी छत्रपती शाहू मिल पर्यंत रॅली काढली. सकाळी 10 वाजता केएमटीच्या सर्व बसेस आहे त्या ठिकाणी 100 सेकंदासाठी थांबविण्यात आल्या होत्या. यावेळी बसमधील प्रवाश्यांनी व कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी महापालिका मुख्य इमारतीमध्ये उप-आयुक्त शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त विनायक औंधकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टिना गवळी, कर निर्धारक व संग्राहक वर्षा परिट, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, अंतर्गत लेखापरिक्षक संजय भोसले, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, नगरसचिव सुनिल बिद्रे, रवका अधिकारी अशोक यादव, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.