बहिरेश्वर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील महे येथील सेवा संस्थेत भैरवनाथ महाविकास सत्तारुढ आघाडीने सत्ता कायम राखली.
महे येथे झालेल्या निवडणुकीत भैरवनाथ महाविकास सत्तारुढ आघाडी, व भैरवनाथ शेतकरी सेवा पॅनेल यांच्यात थेट झाली. दोन्ही गटाकडून एकुण ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यापैकी बाजीराव जरग, सर्जेराव हुजरे,सज्जन पाटील, पांडुरंग पाटील, पांडुरंग कांबळे, बुध्दीराज पाटील यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ महाविकास सत्तारुढ आघाडीने तब्बल १३ जागांवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. तर विरोधी आघाडी किरण नवाळे, पंडित पाटील, बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ शेतकरी सेवा पॅनेल ला ४ जागांवर समाधान मानावे लागले. सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.