उद्योगपती विनायकजी राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध कार्यक्रम

     कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्योगपती तसेच ई- स्टोअर इंडियाचे नॅशनल कोर कमिटी हेड विनायकजी राऊत यांचा 1 मे (रविवार) रोजी होणारा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गारगोटी कोल्हापूर रोडवरील तुरंबे- कासारवाडा या मध्यवर्ती ठिकाणी सायंकाळी 4 वाजता वाढदिवस सन्मान सोहळा साजरा होणार आहे.

     वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सकाळी 10.30  ते  12.30  या वेळेत विनायकजी राऊत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी कार्यक्रम स्थळी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ई- स्टोअर इंडियामधील बंगलो व कार विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून ,अभिनेत्री मानसी नाईक तसेच कॉमेडी फेम भाऊ कदम,  कुशल बद्रिके,  गौरव मोरे,  शिवाली परब यांचा कॉमेडी शो, लेझर लाईट शो, डिजे शो, मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक, बॉडी बिल्डर यांचे सादरीकरण अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी या वाढदिवस सोहळ्यास ई स्टोअर परिवारातील कुटुंबीय व पंचक्रोशीतील लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाढदिवस गौरव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.