राजषि छत्रपती शाहु महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने फुटबॉल, कुस्ती स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर : लोकराजा राजषि छत्रपती शाहु महाराज कृतज्ञता पर्वाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांचेमार्फत व कोल्हापूर जिल्हा तालीम संघ व कोल्हापूर असोशिएशन यांचे सहकार्याने दि. १६ ते २३ मे कालावधीमध्ये फुटबॉल (गट अ) स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच दि. २० ते २२ मे २०२२ या कालावधीमध्ये खासबाग मैदान येथे जिल्हा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे आहे.

फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार येणार असून दि.१६ मे २०२२ रोजी सकाळी ०७:३० वा स्पर्धेचा पहिला सामना होणार असून दुपारी ४.०० वाजता मान्यवरच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी कोल्हापूर स्पोटर्स असो. मधील ए गटातील संघाची निवड केली आहे. या स्पर्धा नॉक-आऊट पध्दतीने घेतल्या जाणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी रु.७५०००/-, व्दितीय क्रमांकासाठी रु.५००००/- तृतीय क्रमांकासाठी २५०००/- असे रोख पारितोषक, प्रमाणपत्र व ट्रॉपी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात येणार आहे.

तसेच दि. २० ते २२ मे २०२२ या कालावधीमध्ये खासबाग मैदान येथे जिल्हास्तर व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन कर्ण्यात येणार आहे. सदर कुस्ती स्पर्धा आखाडयामध्ये फ्रि स्टाईल कुस्ती गटामधील वजन गट मुले ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ अशा ९ वजनी गटामध्ये नॉकऑऊट पध्दतीने स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. सदर स्पर्धेचा दर्जा हा जिल्हास्तर असून स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील मल्लांसाठीच आहेत. या मधील प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख रक्कम अनुक्रमे प्रथम क्रमांक रु.५०००/-, व्दितीय रु.३०००/-, तृतीय रु.२०००/- व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यांचप्रमाणे खुल्या गटातील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन याच कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा मुलासाठी वजनगट ८६ ते १२५ व मुलीसाठी वजनगत ६५ ते ७६ या वजनी गटामधे नॉकआऊट पध्दतीने आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी रोख रक्कम अनुक्रमे प्रथम क्रमांक रु. ७५०००/-, व्दितीय रु.५००००/-, तृतीय रु.२५०००/- प्रमाणपत्र व शिल्ड दिले जाणार आहे.