पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मुंबई : सध्या राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरु असून उन्हामुळे नागरिकही त्रस्त आहेत. कडाक्याच्या उन्हातही अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात 21 एप्रिलपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 21 आणि 22 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. एकीकडे उन्हाची तीव्र लाट सुरु असातना दुसरीकडे मात्र काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तसंच सातारा, कोल्हापुरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

🤙 9921334545