कोल्हापूर : पुणे येथे इंडियन बॉडी बिल्डिंग व फिटनेस फेडेरेशनने घेतलेल्या ६२ व्या मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील तीन स्पर्धकांनी आपला दबदबा राखत यश मिळवळे आहे.
या स्पर्धेतील १०० किलो वजनी गटात वडकशिवाले येथील आकाश कवडे यांने ब्राँझ पदक पटकावले. तर ७५ किलो वजनी गटात कसबा बावडा येथील विशाल सिन्हा याने ब्राँझ पदक पटकावले तर मिस्टर युनिव्हर्स व मिस्टर इंडियाचा बहुमान देखील त्याने पटकावला आहे. तसेच ७५ किलो वजनी गटात कसबा बावडा येथील ओंकार तानाजी पडळकर याने चौथा क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेस भिमसिंह पाटील, संजय मोरे, विजय मोरे, राहुल परीट, सचिन चांदेकर परीक्षक होतेत. स्पर्धेला महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.