प्रसाद पाटील यांचे नेतृत्व आदर्शवत : बळीराम मोरे

 रत्नागिरी : शैक्षणिक, सामाजिक तसेच  संघटनात्मक कामातील उठावदार कार्यपद्धतीमुळे सर्वच क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रसाद पाटील यांनी नेतृत्वाचा ठसा उमटविला असून त्यांचे नेतृत्व आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बळीराम मोरे यांनी काढले.  

   रत्नागिरी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन कै. ल. रा. जाधव फौंडेशन, सिंधुदुर्गच्यावतीने दिला जाणारा कै. ल. रा. जाधव राज्य उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार नुकताच प्रसाद पाटील यांना जेष्ठ शिक्षक नेते बबन बांडागळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. देवरूख येथील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रूपेश जाधव होते.

    प्रसाद पाटील म्हणाले, मी माझ्या पुरोगामी शिलेदारांच्या सहकार्यांने प्रामाणिकपणे काम करीत राहिलो. पदांच्या अथवा सन्मानाच्या मागे कधी लागलो नाही पण कामाच्या पाठोपाठ पदे व सन्मान चालत आले. आज मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या सर्व पुरोगामी शिलेदारांना समर्पीत करीत असून हा पुरस्कार संघटनात्मक कामासाठी सदैव प्रेरणादायी ठरेल.

कार्यक्रमास राज्य महिला सरचिटणीस शारदा वाडकर, राज्य सचिव रंगराव वाडकर, राज्य उपाध्यक्ष दिलीप भोई, राज्य संघटक पी. आर. पाटील, कोकण विभागाचे अध्यक्ष दिलीप महाडीक, पुरोगामीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, महिला जिल्हा सरचिटणीस अलका थोरात, प्रसिध्दी प्रमुख अशोक खाडे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन जाधव, तानाजी पावले, प्रमिला कांबळे, शरद पाटील, सदाशिव थोरात, के एस पाटील, बाबा रणसिंग, उत्तम घाटगे, संपत पाटील, सुरेश हुली, विकास पाटील, सुरेश गुडुळकर, सुरेश पुजारी, प्रभाकर चौगुले, संदीप गिरी, बाबू केसरकर उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश गोताड यांनी केले. सूत्रसंचालन संजय बांडागळे तर मुकुंद वाजे यांनी आभार मानले.

पुरस्काराची रोख रक्कम शैक्षणिक पालकत्व उपक्रमास प्रदान

     कै. ल. रा. जाधव उत्कृष्ट राज्य नेतृत्व पुरस्काराची रोख रक्कम रू.५०००/- पुरस्कार प्रदान होताच प्रसाद पाटील यांनी पुरोगामी शैक्षणिक पालकत्व उपक्रमास सुपूर्द करून १० विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारले.