कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज जाहीर झाली. निवडणूक रिंगणात एकूण पंधरा उमेदवार होते त्यापैकी 13 उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली आहेत. तर नोटांचा तिसऱ्या क्रमांकाची 1799 मते मिळाली आहेत.
या निवडणुकीत अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. 13 पैकी 6 उमेदवारांना 2 अंकी संख्येत मते मिळाली आहेत. त्यांना शंभरचा आकडाही पार करता आलेला नाही. तर सात उमेदवारांना चार अंकी आकडा पार करता आलेला नाही. एक हजाराच्या आसपासही पोचू शकलेले नाहीत. या सातही उमेदवारांना पाचशेच्या आतच मते मिळाली आहेत.
1) जाधव जयश्री चंद्रकांत (कॉंग्रेस, 97,332
2,) सत्यजित कदम (भाजप 78025)
3) यशवंत कृष्णा शेळके (नॅशनल सोशालिस्ट पार्टी, 326)
4) विजय शामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी, 165)
5) शाहिद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी 469)
6) देसाई सुभाष वैजू (अपक्ष 98))
7) बाजीराव सदाशिव नाईक (अपक्ष 66)
8) भोसले भारत संभाजी (अपक्ष 43)
9) मनिषा मनोहर कारंडे (अपक्ष 49 )
10) माने अरविंद भिवा (अपक्ष 58)
11) मुस्ताक अजिज मुल्ला (अपक्ष 96)
12) करुणा धनंजय मुंडे (अपक्ष 134)
13) राजेश सत्याप्पा नाईक (शेतकरी संघटना 114)
14) राजेश सदाशिव कांबळे (अपक्ष 111)
15) संजय भिकाजी माघाडे (अपक्ष 233)
16) नोटा (1799)
17) बाद मते (36)