कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीस आज (शनिवारी) राजाराम तलावाशेजारील गोदामात प्रारंभ झाला आहे.
ही मतमोजणी १६ टेबलांवर २६ फेऱ्यांत होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का एक टक्क्यांनी वाढला असून यावेळी ६१.१९ टक्के मतदान झाले आहे. या वाढलेल्या मतदानाचा काॅंग्रेसच्या जयश्री जाधव, भाजपचे सत्यजित कदम यापैकी काेणाला फायदा हाेणार हे आज समजणार आहे.
निकालाबाबत प्रचंड उत्स्कुता आहे. निवडणूक रिंगणात एकूण १५ उमेदवार आहेत. मात्र, मुख्य लढत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भारतीय जनता पक्षाचे सत्यजित कदम यांच्यात होत आहे. निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.