कागल : रामनवमी आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीमध्ये प्रभू श्रीरामांचा अवमान केल्याचा आरोप आरोप करत शाहू उद्योग समूहाचे प्रमुख व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे संतप्त झाले आहेत. श्रीरामांचा एकेरी उल्लेख केला असल्याचा निषेधार्थ आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी समरजितसिंह घाटगे समर्थकांसह मोर्चाने कागल पोलीस ठाण्यासमोर दाखल झाले. पोलिसांनी मोर्चा पोलिस ठाण्याच्या आवारामध्येच अडविला. पोलिस तक्रार दाखल करून घेत नसल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितलेला. मुश्रीफा यांनी रामनवमीला जन्म झाल्याचा केलेला दावा खोटा असल्याचे सांगत तसे पुरावे घाटगे यांनी माध्यमांसमोर सादर केले. रामनवमीचा आपला जन्म आहे हा मुश्रीफ यांचा दावा संशोधनाचा विषय असून त्यांच्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांच्या नावातील अद्याक्षरे घेऊन राम असा प्रभू रामचंद्र यांचा एकेरी उल्लेख केला असल्याचे त्यांनी सांगितले.
.