किरीट सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार; नील सोमय्याचाही अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई : आयएनएस विक्रांत प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यानंतर त्यांचा मुलगा नील सोमय्याचाही जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या व नील सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

आयएनएस विक्रांत प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील अंडर ग्राउंड होत मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. काल सोमवारी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने अर्ज फेटाळला. तर आज नील सोमय्या यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. नील सोमय्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता होती. मात्र कोर्टाने ही शक्यता फोल ठरवत नील सोमय्या यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. यामुळे नील सोमय्या यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.