कोल्हापूर : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा विजेता कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांना दोन लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले.
मंत्री शंभूराज देसाई अध्यक्ष असलेल्या शिवाजीराजे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर येथील जोतिबा डोंगरावर दोन लाख रूपयांचा धनादेश शाहुवाडी विभागाचे उपअधीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला प्रदान करण्यात आला.
यावेळी पृथ्वीराजचे वडील बाळासाहेब पाटील, पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे आदी सहकारी सोबत उपस्थित होते.