बहिरेश्वर (प्रतिनिधी) : शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील कृष्णात गणपती कांबळे (वय ३०) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी, आज सकाळी रणजीत बाळासो पाटील हे आपल्या शेतातील विहिरीची मोटर सुरू करण्यासाठी गेले होते. त्यांना विहिरीमध्ये मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी पोलिसांत कळवले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन हेड कॉन्स्टेबल विजय गुरव व नायक संग्राम पाटील यांनी पाहणी करून मृतदेह बाहेर काढला. गेली चार दिवस मयत कृष्णात कांबळे हे बेपत्ता होते.